Last Updated: Thursday, July 12, 2012, 17:33
www.24taas.com, श्रीनगर पाकिस्तानची घुसखोरी कायम आहे. पाकमधून अतिरेकी कारवायांना प्रोत्साहन दिले जात आहे. आता तर यावर पाकने कडी केली आहे. चक्क पाकिस्तानचा एक सैनिक भारतातच घुसला. तो कसा आला आणि का आला याची माहिती मात्र, देण्यात आलेली नाही. लष्कराच्या जवानांना या पाकिस्तानच्या सैन्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
भारतात घुसलेल्या सैनिकाचे नाव अरीफ अली आहे. तो जम्मू काश्मीरमधील पुँछ जिल्ह्यात कर्नी सेक्टरमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांना दिसला. त्यानंतर त्याला आज अटक केली.
अरीफ हा पाकिस्तान लष्करातील २५ फ्रंटियर फोर्समध्ये तो कार्यरत आहेत. आज सकाळी सहाच्या सुमारास त्याला त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी सुरु आहे. त्याच्याजवळ कोणतीही शस्त्रास्त्रे सापडली नाहीत, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली.
First Published: Thursday, July 12, 2012, 17:33