सुनीता विल्यम्स करणार अंतराळातून मतदान - Marathi News 24taas.com

सुनीता विल्यम्स करणार अंतराळातून मतदान

www.24taas.com, वॉशिंग्टन
 
आता, भारतीय वंशाची पण अमेरिकेची नागरिक असलेली अंतराळावीर सुनीता विल्यम्स अंतराळातून मतदान करणार आहे. ती मतदान करणारी पहिली महिला ठरणार आहे.
 
१४ जुलै २०१२ पासून सुनीता विल्यम्स ही अवकाश मोहिमेवर निघणार आहे. तिची ही मोहीम पूर्ण होतेय १२ नोव्हेंबर रोजी. पण, या दरम्यान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. ही निवडणूक होतेय सुनीता परण्याच्या सहा दिवस अगोदर म्हणजेच ६ नोव्हेंबर रोजी... आणि सुनीता मात्र जागरुक नागरिक आहे. आपला मतदानाचा हक्क आणि कर्तव्य तिला पार पाडायचंय. त्यासाठी ती चक्क अंतराळातून तिच्या आवडत्या राष्ट्रध्यक्षपदाच्या उमेदवाराला मतदान करणार आहे.
 
सुनीता विल्यम्स हिचे वडील गुजराती आहेत मात्र सुनीतानं अमेरिकचं नागरिकत्व स्विकारलं आहे. ती फ्लोरिडा राज्याची मतदार आहे. अवकाशातून मतदान करण्यासाठी तिला आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र ‘व्होटींग फ्रॉम स्पेस’ हा कार्यक्रम राबवणार आहे.

First Published: Sunday, July 15, 2012, 07:45


comments powered by Disqus