'नियम बनवण्याचा हक्क केवळ भारताला' - Marathi News 24taas.com

'नियम बनवण्याचा हक्क केवळ भारताला'

www.24taas.com, नवी दिल्ली
 
पंतप्रधान कार्यालयानं अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामांना जोरदार प्रत्यूत्तर दिलंय. भारत परदेशी गुंतवणूकदारांचा जगातला तिस-या क्रमांकाचं पसंतीचा देश आहे. असं पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलंय.
 
ओबामांना प्रत्यूत्तर देण्यासाठी पंतप्रधान कार्यालयानं यूएन रिपोर्टचा दाखला दिलाय. ओबामांनी भारतात अजूनही परदेशी गुंतवणूक कठीण आहे तसंच भारतात विकास करायचा असल्यास परदेशी गुंतवणूक गरजेची असल्याचं म्हटलं होतं.ओबामांच्या या टीकेला आता पंतप्रधानांनीच उत्तर दिलंय. पंतप्रधानांनी भारत परदेशी गुंतवणूकदारांचा जगातला तिस-या क्रमांकाचं पसंतीचा देश आहे असं ट्विटरवर म्हटलंय.
 
चीनमध्ये 8 टक्के परदेशी गुंतवणूक येते तर भारतात 31 टक्के परदेशी गुंतवणूक होते. तसंच नियम बनवण्याचा हक्क केवळ भारताला असल्याचंही वाणिज्य आणि उद्योगमंत्री आनंद शर्मांनी म्हटलंय. तसंच भारतामुळे दक्षिण आशियात गुंतवणूक वाढली असल्याचंही पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलंय.

First Published: Monday, July 16, 2012, 22:49


comments powered by Disqus