Last Updated: Tuesday, July 17, 2012, 17:09
www.24taas.com, नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्ससह दोन अंतराळवीरांनी स्पेस सेंटरमधून पृथ्वीवर संवाद साधला. अंतराळात झेपावल्यानंतर दोन दिवसांनी सुनीता स्पेस सेंटरमध्ये दाखल झाली. सुनीता आणि इतरांनी थेट अंतराळातून पृथ्वीवर संवाद साधला.
आपल्या कुटुंबियांशीही त्यांनी गप्पा मारल्या. सुनीता आणि तीच्या सहकार्यांची अंतराळातली ही मोहीम चार महिन्यांची आहे. नोव्हेंबरच्या मध्यात ते पृथ्वीवर परततील. या काळात ते ३० प्रयोगावर काम करतील.
यापूर्वी सुनीतानं अंतराळातल्या स्पेस स्टेशनमध्ये अनेक महत्वाचे प्रयोग केले ज्यात विद्यार्थ्यांना प्रचंड फायदेशीर ठरलेल्या दोन रेडीओ सिग्नल यंत्रणेचाही समावेश आहे. पहिल्या मोहिमेत सुनीता विक्रमी १९५ दिवस अंतराळात राहिली होती.
First Published: Tuesday, July 17, 2012, 17:09