राजेश खन्नांच्या निधनाने पाकमध्ये दुःख! - Marathi News 24taas.com

राजेश खन्नांच्या निधनाने पाकमध्ये दुःख!

www.24taas.com, इस्लामाबाद
राजेश खन्नाचे व्यक्तीमत्व भारत-पाक सीमेपलीकडील होते, आज त्यांनी जगाचा निरोप घेतला आणि शेजारी देश असलेल्या पाकिस्तानात हे सिद्ध झाले. हिंदी चित्रपटातील रोमान्सचे बादशहाच्या निधनाबद्दल खेद व्यक्त केला.
 
पाकिस्तानचे प्रधानमंत्री यूसुफ रजा गिलानी यांनी खन्ना यांच्या निधनानंतर आपल्या शोक संदेशात म्हटले की, राजेश खन्ना एक महान कलाकार होते. त्याचे चित्रपट आणि कला क्षेत्रातील योगदान कायम लक्षात राहिल.
 
आज पाकिस्तानच्या विविध वृत्त वाहिन्यांमध्येही राजेश खन्ना यांच्या निधनासंबंधी बातम्या देण्यात आल्या. जिओ टीव्हीने राजेश खन्ना यांना श्रद्धांजली देताना एका तासाचा विशेष कार्यक्रम केला होता.
गायक आणि अभिनेते अली जफ यांनी ट्विटवर म्हटले की, राजेश खन्ना- ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. त्यांच्या सिनेमांच्या आणि गाण्यांच्या अनेक सुंदर आठवणी आहेत..

First Published: Wednesday, July 18, 2012, 19:54


comments powered by Disqus