अमेरिकेत जाण्याचा मार्ग मोकळा... - Marathi News 24taas.com

अमेरिकेत जाण्याचा मार्ग मोकळा...

www.24taas.com, न्यूयॉर्क
 
अमेरिकेत जाणं म्हणजे बऱ्याच कटकटी, व्हिसासाठी होणारा गोंधळ, त्यामुळे होणारा मनस्ताप, मात्र आता या साऱ्यापासून लवकरच सुटका मिळणार आहे. अमेरिकेत जाऊ इच्छिणार्‍या हिंदुस्थानवासीयांसाठी एक खुशखबर आहे.
 
हिंदुस्थानी पर्यटकांसाठी आणि व्यापार्‍यांसाठी व्हिसाच्या अटी शिथिल केल्याची माहिती वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे झालेल्या एका कार्यक्रमात अमेरिकन दूतावासाच्या अधिकार्‍यांनी दिली. सात वर्षांखालील मुलांना अनिवासी व्हिसासाठी मुलाखत द्यावी लागणार नाही. त्यांना फक्त अर्ज भरावा लागेल. कोणत्याही कारणास्तव व्हिसा मिळण्यास वेळ लागल्यास हिंदुस्थानी अर्जदारास अतिरिक्त व्हिसा फी द्यावी लागणार नाही.
 
मुंबईत अमेरिकेच्या दूतावासातर्फे व्हिसा देण्यासाठी ४० केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे अर्जदारांचे व्हिसा केंद्रातले काम अल्पावधीत होईल. अनपेक्षितपणे किंवा आपत्कालीन परिस्थितीत व्हिसा हवा असल्यास इ-मेलमार्फत अर्ज करता येणार आहे.
 
 
 
 

First Published: Thursday, July 19, 2012, 12:42


comments powered by Disqus