बॅटमॅनच्या प्रिमिअरला बेछूट गोळीबार, १४ ठार - Marathi News 24taas.com

बॅटमॅनच्या प्रिमिअरला बेछूट गोळीबार, १४ ठार

www.24taas.com, डेनवर
बहुचर्चित बॅटमॅन सिरिजच्या नव्या चित्रपटाच्या प्रिमिअरवेळी एका अज्ञात व्यक्तीने केलेल्या बेछूट गोळीबारात १४ जण ठार तर ५० जण जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
बॅटमनच्या सिरीजच्या डार्क नाईट रिसेस या चित्रपटाच्या प्रिमिअरच्यावेळी गॅस मास्क लावून एक माणूस सिनेमा थिएटरमध्ये घुसला आणि त्याने बेछूट गोळीबार केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
 
या अज्ञात व्यक्तीने धुराचा बॉम्ब फोडल्याचेही वृत्त आहे. या संदर्भात एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

First Published: Friday, July 20, 2012, 15:30


comments powered by Disqus