Last Updated: Saturday, July 21, 2012, 16:35
www.24taas.com, लाहोर 
महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. किंबहुना आपण महिलांवर तितके अत्याचार करतो. पण हे प्रकार फक्त भारतातच नाही तर ते इतरत्रही असेच प्रकार सुरू आहेत. पाकिस्तानमधील लाहोर शहरातील एका पोलिसाने आपल्या बहिणीने जीन्स घातल्याने तिची गोळ्या घातून हत्या केल्याचे, पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
.. पोलिस शिपाई असद अली हा त्याची बहिण नजमा बिबी (वय २२) ही कायम जीन्स घालत असल्याने नाराज असे. शुक्रवारी या दोघांमध्ये या कारणाने वाद झाल्याने चिडलेल्या असदने नजमाची गोळ्या घालून हत्या केली. गेल्या काही दिवसांपूर्वी असदने नजमाला असे कपडे वापरणे बंद न केल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती.
.असदने धमकी दिल्याने नजमाने शहादरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करत, सुरक्षाव्यवस्था पुरविण्याची मागणी केली होती. पोलिसांनी नमजाच्या तक्रारीकडे लक्ष दिले नाही. अखेर शुक्रवारी असदने तिची हत्या केली असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
First Published: Saturday, July 21, 2012, 16:35