रशिया आणि फ्रांसदरम्यान थेट रेल्वेसेवा - Marathi News 24taas.com

रशिया आणि फ्रांसदरम्यान थेट रेल्वेसेवा

झी २४ तास वेब टीम, लंडन
 
युरोप फिरायचा विचार डोक्यात असेल, तर या बातमीकडे लक्ष द्या. रशिया आणि फ्रांसदरम्यान थेट रेल्वेसेवा सुरु करण्यात आली आहे.
 
मॉक्सोतून पॅरिसला जाणाऱ्या पहिल्या ट्रेनला नुकतीच हिरवा झेंडा दाखवण्यात आली. ३ हजार १७७ किलोमीटरचा टप्पा ही ट्रेन पूर्ण करणार आहे. युरोपमधला हा सर्वात जास्त लांबीचा दुसरा मार्ग आहे. मॉस्को ते पॅरिसच्या या प्रवासादरम्यान जर्मनीतल्या बर्लिनसह पोलंड आणि बेलारूसमधल्या सर्व प्रमुख स्थानकांवर या ट्रेनला थांबा देण्यात आलाय.
 
दोनशे किलोमीटर प्रति तास या वेगानं धावणारी ही ट्रेन ३८ तासांमध्ये मॉस्को ते पॅरिस अंतर पूर्ण करेल. युरोपातले सर्व प्रमुख शहरांना जोडणारा हा मार्ग असल्यानं, युरोप फिरण्याची हौस आता पर्यटकांना भागवता येणार आहे.

First Published: Saturday, December 17, 2011, 13:46


comments powered by Disqus