मायकल जॅक्सनच्या वस्तुंचा लिलाव - Marathi News 24taas.com

मायकल जॅक्सनच्या वस्तुंचा लिलाव

झी २४ तास वेब टीम, न्यू यॉर्क
 
मायकल जॅक्सनच्या घरातील मायकल जॅक्सनच्या संबंधित इतर वस्तूंचा पुढील आठवड्यात लिलाव होतोय. या लिलावानंतर जून २००९ मध्ये मायकल जॅक्सनच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या दु:खद अध्याय संपणार आहे.
 
मायकल जॅक्सनने २००९ मध्ये आपल्या 'कमबॅक'साठी बेव्हर्ली हिल्स भागात एक घर भाड्यानं घेतलं होतं. या घरातल्या जवळपास ५०० पेन्टिंग, फर्निचर आणि दागिन्यांचा लिलाव होणार आहे. मायकलच्या कुटुंबासंबंधीच्या तसंच मृत्यूपूर्वीच्या महिनाभर आधीच्या वस्तूंचा मात्र लिलाव केला जाणार नाही. जॅक्सन कुटुंबाच्या विनंतीवरून मायकल जॅक्सनचा मृतदेह ज्या बेडवर ठेवण्यात आला होता. त्यालाही लिलावातून वगळण्यात आलंय. तसंच शेवटच्या काही दिवसात मायकलच्या बेडरूममधील आरशावर काही गाण्याच्या ओळी लिहिल्या आहेत. त्या आरशाची किंमत ६८ हजार डॉलर्स इतकी लावण्यात आली आहे. तसंच जॅक्सनची सही असलेली हॅटही लिलावात ठेवण्यात येणारेए.
 
ख्रिसमस हा मायकल जॅक्सनचा आवडता सण होता. त्यामुळं त्याच्या फॅन्सना एकत्र आणण्यासाठी, त्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, हा लिलाव आयोजित करण्यात आला होता.

First Published: Tuesday, December 20, 2011, 15:41


comments powered by Disqus