Last Updated: Wednesday, December 21, 2011, 08:06
झी २४ तास वेब टीम, इस्लामाबाद पाकिस्तानला आर्थिक मदत देण्यास अमेरिकेने नकार घंटा वाजविली आहे. त्यामुळे पाकिस्तान अडचणीत आला आहे.
आर्थिक मदत देण्यास अमेरिकेने नकार दिल्याने तुटीच्या अर्थसंकल्पामुळे आधीच जेरीस आलेल्या पाकिस्तानला दहशतवादाविरुद्धच्या लढाईच्या अतिरिक्त खर्चाचा बोजा आता उचलावा लागणार आहे. त्याचा अर्थसंकल्पावर मोठा ताण येण्याची शक्यता आहे.
दहशतवादाविरुद्धच्या लढाईसाठी होणाऱ्या खर्चाची अमेरिकेकडून होणारी भरपाई, गेल्या मे महिन्यापासून स्वीकारलेली नाही, असे स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्यांमध्ये म्हटले आहे. अबोटाबाद येथे अल् कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याच्यावर गेल्या २ मे रोजी कारवाई करण्यात आली होती. दहशतवादाविरुद्धच्या लढाईपोटी पाकिस्तानला अमेरिकेकडून दरमहा १० ते १४ कोटी रुपये मदतीपोटी मिळत होते. गेल्या सहा महिन्यांपासून ही रक्कम आता ६० कोटी रुपयांवर गेली आहे.
अमेरिकेच्या युती साह्य निधीतून ही मदत देण्यात येत होती. ओसामा बिन लादेनवरील कारवाईपूर्वीच अमेरिकेने ही मदत देण्यात दिरंगाई सुरू केली होती. प्रसंगी ही मदत देण्यास नकारही देण्यात येत होता. दहशतवाद्यांविरुद्धची कारवाई अधिक व्यापक करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी अमेरिकेने हे धोरण स्वीकारले आहे.
First Published: Wednesday, December 21, 2011, 08:06