अमेरिकन सैन्य २०१४नंतरही अफगाणिस्तानातच? - Marathi News 24taas.com

अमेरिकन सैन्य २०१४नंतरही अफगाणिस्तानातच?

झी २४ तास वेब टीम, वॉशिंग्टन
 
२०१४ या वर्षापर्यंतच सैन्य ठेवण्याची मर्यादा देण्यात आली असली, तरी त्यानंतरही अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सैनिक तैनात असण्याची शक्यता अमेरिकन सैन्याच्या एका प्रमुख लष्करी अधिकाऱ्याने दिली आहे.
 
 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी आधीच अमेरिकन सैनिकांच्या परतण्यासंबधीचा कालावधी जाहिर केला आहे. सध्या अफगाण सरकारशी चालू असलेल्या सैन्यविषयक चर्चेमध्ये २०१४ नंतर अमेरिकन सुरक्षा दलाचं स्वरुप काय असणार या मुद्दयावर प्रामुख्याने चर्चा होणार आहे. असं अफगाणिस्तानमधील अमेरिकन आणि ‘नाटो’चे कमांडर जनरल जॉन आर एलेन यांनी सांगितलं आहे.
 
‘न्यूयॉर्क टाईम्स’ या वृत्तपत्रात म्हटल्याप्रमाणे एलेन यांनी सांगितलं आहे की देशा विदेशातून मदतीचा ओघ सुरू राहिला तर, दहशतवादी संघटनांची ताकद २०१४ पर्यंत पूर्णतः कमजोर होईल. मात्र सल्लागार, प्रशिक्षक इ. लोकांच्या संख्येबद्दल मात्र काही बोलण्यास एलेन यांनी नकार दिला. तसंच त्यांनी हे ही सांगण्यास नकार दिला की २०१४ नंतर किती अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमध्ये राहाण्याची शक्यता आहे.

First Published: Wednesday, December 21, 2011, 17:36


comments powered by Disqus