इराकमध्ये स्फोट मालिकेत ६३ जण ठार - Marathi News 24taas.com

इराकमध्ये स्फोट मालिकेत ६३ जण ठार

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
 
बगदादमध्ये गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेत ६३ लोकं मृत्युमुखी पडले तर अनेक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. बगदादमध्ये विध्वंस घडवण्याच्या उद्देशाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हे स्फोट घडवण्यात आले. इराकमधील सून्नी आणि शिया पंथीयांमध्ये आठवड्याच्या अखेरीस सुरु झालेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भयावह हिंसाचाराने थैमान घातलं आहे. इराकचे शिया पंतप्रधान आणि सर्वात बलाढ्य सून्नी राजाकीय नेते यांच्यातील राजकीय वादंगानंतर देशातील जातीय संघर्षाच्या जखमा पुन्हा भळाभळा वाहू लागतील अशी भीती निर्माण झाली आहे.
 
इराकी अधिकाऱ्यांनुसार मंगळवारी सकाळी लागोपाठ नऊ स्फोट बगदादच्या उपनगरांमध्ये झाले. सर्वात भयानक हल्ला अल अमल या उपनगरात झाला तिथे सात लोक जागीच ठार झाले. अल अमल इथे आधी झालेल्या स्फोटातील जखमींच्या मदतकार्यासाठी आलेल्या बचावपथक आणि अधिकारी या स्फोटाचे लक्ष्य होते. पश्चिम बगदादच्या एका उपनगरात रस्त्या लगत झालेल्या स्फोटात चार लोक ठार झाले. पंतप्रधान नुरी अल मलिकी यांनी सून्नी उप राष्ट्राध्य तारिक अल हाशेमी यांनी सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य करणाऱ्या मारेकऱ्यांची टोळी बाळगल्याचा आरोप केला आहे. अल मलिकी सून्नी पंथीय उप पंतप्रधान सलेह अल मुतलक यांच्या विरोधात अविश्वास ठराव आण्ण्याच्या प्रयत्नात आहेत. शिया आणि सू्न्नी पंथीयांमध्ये तीव्र झालेल्या राजकीय संघर्षाने इरकामधल्या स्फोटक वातारवणाचा भडका उडाला आहे.

First Published: Thursday, December 22, 2011, 11:37


comments powered by Disqus