'रशियात भगवतगीता', कोणी रोखेल का 'आता' - Marathi News 24taas.com

'रशियात भगवतगीता', कोणी रोखेल का 'आता'

झी २४ तास वेब टीम, मास्को
 
भारतातील हिंदूंचा पवित्र ग्रंथ भगवतगीतेवर बंदी घातली जावी या मागणीने गेले काही दिवस रशियात जोर धरला होता. पण आता रशियात सायबेरियामधील न्यायालयाने भगवदगीतेवर बंदी लावण्याचा मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे.
 
याआधी न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी बुधवारपर्यंत पुढे ढकलली होती.भगवदगीतेवर बंदी लावण्याचं प्रकरण सायबेरियातील तोमस्क न्यायालयात मागील सहा महिन्यापासून सुरू आहे. भगवदगीतेवर बंदी लावण्याचं प्रकरण सायबेरियातील तोमस्क न्यायालयात मागील सहा महिन्यापासून सुरू आहे.
 
या पार्श्वभूमीवर रशियाचे भारतातील राजदूत कदाकीन यांनी गीतेवर बंदी आणण्याची मागणी हे वेडाचाराचे कृत्य असल्याचे सांगत खेद व्यक्त केला. ' रशिया हा धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही विचारांचा देश असून येथे सर्व धमिर्यांना समान वागणूक दिली आहे. सर्व धमिर्यांच्या पवित्र ग्रंथांना येथे आदराचे स्थान आहे.  भारताचे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी रशियन कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागतच केले आहे.

First Published: Thursday, December 29, 2011, 18:42


comments powered by Disqus