अनुजचे मारेकरी ताब्यात? - Marathi News 24taas.com

अनुजचे मारेकरी ताब्यात?

झी २४ तास वेब टीम
 
अनुजची मँचेस्टरमधील काही माथेफिरूंनी गेल्या रविवारी हत्या केली होती. पोलिसांनी या हत्येप्रकरणी एक १९ वर्षीय आणि एक २० वर्षीय युवकांना संशयावरून अटक केली होती. यातील १९ वर्षीय युवकाला जामीन मिळाला असला तरी २० वर्षीय युवक पोलिसांच्या ताब्यात आहे.
 
दरम्यान, या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या लंडन पोलिस दलातील पोलीस अधिकारी रुस जॅकसन आणि आणखी एक अधिकारी अनुजच्या कुटुंबातील व्यक्तींची आणि भारतीय अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. मँचेस्टर पोलिसांनी अनुजच्या हत्येची माहिती देणाऱ्याला ५० हजार पौंडचे बक्षिस जाहीर केले आहे.
 
पुण्याच्या अनुजच्या ब्रिटनमध्ये झालेल्या हत्ये प्रकरणी मँचेस्टर पोलीस आज पुण्यात दाखल होत आहेत. चौकशीसाठी मँचेस्टर पोलीस अनुजच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. अनुजची २६ डिसेंबरला ब्रिटनमध्ये हत्या झाली होती. सुरुवातीला यासंदर्भात हलगर्जीपणा दाखवलेल्या ब्रिटीश प्रशासनानं नंतर मात्र हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं. अनुजची हत्या वर्णद्वेषातून झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळालं आहे. अनुजचा मृतदेह अजून त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात मिळालेला नाही. त्यामुळे त्या दृष्टीनंही ब्रिटीश प्रशासन आणि भारताकडून प्रयत्न सुरू आहेत.

First Published: Monday, January 2, 2012, 11:27


comments powered by Disqus