चीनमध्ये भारतीय अधिकाऱ्यांला धक्काबुकी - Marathi News 24taas.com

चीनमध्ये भारतीय अधिकाऱ्यांला धक्काबुकी

www.24taas.com, शांघाय
 

चीनमध्ये भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याला व्यापाऱ्याला धक्काबुक्की करण्यात आली आहे, भारताने आपली तीव्र नाराजी याबाबत चीनकडे दर्शवली आहे, त्यामुळे चीन सरकार आता यावर काय कारवाई करणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.
 
भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याला स्थानिक व्यापाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना चीनमधील यिवू कोर्टात शनिवारी घडली. शांघायमधील भारतीय वकिलातीत कार्यरत असणारे एस.बालचंद्रन यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे.
 
युरो ग्लोबल ट्रेडिंग या कंपनीने स्थानिक चिनी व्यापा-यांची देणी बुडवल्या प्रकरणी या कंपनीचे संचालक दीपक रहेजा आणि श्यामसुंदर अग्रवाल यांच्या बचावासाठी बालचंद्रन कोर्टात उपस्थित होते. या घटनेची गंभीर दखल घेत परराष्ट्र खात्याने चीनचे नवी दिल्लीतील डेप्युटी चीफ ऑफ मिशन झँग यू यांच्याकडे तीव्र निषेध व्यक्त केला.

First Published: Tuesday, January 3, 2012, 19:33


comments powered by Disqus