२१ महिला अतिरेकी भारतात घुसण्याच्या तयारीत - Marathi News 24taas.com

२१ महिला अतिरेकी भारतात घुसण्याच्या तयारीत


www.24taas.com, नई दिल्ली
 
लष्कर-ए-तोएबाच्या प्रशिक्षित २१ महिला अतिरेकी भारतात घुसण्याच्या तयारीत आहेत. पाकिस्तानमधून काश्मीर खोऱ्यातून प्रशिक्षण शिबीर चालविले जात आहे. त्यासाठी महिलांना लष्कर-ए-तोएबा या अतिरेकी संघटनेने हाताशी धरले आहे.
 
 
२१ महिला अतिरेकी भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती लष्कराच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. लष्कर-ए-तोएबा महिलांचा कॅंम्प चालवत असल्याची माहिती लष्कराच्या एका अधिकाऱ्यांने मंगळवारी दिली. मुजफ्फराबाद येथे दहशवाद्यांचा तळ सुरू आहे. यात महिलांकडून जिहाद घडवून आणण्यासाठी अतिरेक्यांचे प्रयत्न आहेत. त्यासाठी २१ महिलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. जेणे करून या महिलांच्या माध्यमातून हल्ले करणे लष्कर-ए-तोएबाला शक्य होईल, अशी माहिती लष्करातील एका अधिकाऱ्यांने दिली.
 
 
महिलांच्या या गटाला दुखतरीन-ए-तोएबा, असे नाव देण्यात आले आहे. हा गट लष्कर-ए-तोएबा या अतिरेकी संघटनेसाठी काम करीत आहे. या गटाच्या सहाय्याने काश्मीर खोऱ्यात हल्ले करून घातपात घडवून आणण्याचा लष्कर-ए-तोएबाचा डाव आहे. त्यासाठी पाकिस्तानच्या अधिकृत काश्मीर भागातून महिलांच्या या गटाला प्रशिक्षण देण्यात येत आहे. या पाकच्या भागात ४२ प्रशिक्षण शिबिरे चालविली जात आहेत. या ठिकाणी महिलांचा वावर दिसून येत आहे.
 
 
प्रशिक्षित महिला अतिरेक्यांना दुसऱ्या देशांतून हवाईमार्गे भारतात घुसविण्याचा प्रयत्न आहे. सूत्रांच्या माहिती नुसार मुंबईत करण्यात आलेल्या अतिरेकी हल्ल्यात महिला अतिरेक्यांचा हात आहे. महिला अतिरेकी तयार करण्यासाठी जकी-उर-रहमान लखवीचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. काश्मीरमध्ये मारले गेलेल्या अतिरेक्यांच्या माध्यमातून ही माहिती पुढे आली आहे, असे लष्कराच्या एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

First Published: Wednesday, January 4, 2012, 14:33


comments powered by Disqus