Last Updated: Friday, January 6, 2012, 11:14
www.24taas.com , कराची पाकिस्तानमधील कराची शहरामध्ये आज शुक्रवारी झालेल्या गोळीबारात पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. दोन ठिकाणी गोळीबारीच्या घटना घडल्या. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
गोळीबारात अवामी राष्ट्रीय पक्षाचे नेते सईद अहमद खान यांचा मृत्यू झाला आहे. अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची माहिती जिओ या वृत्तसंस्थेने दिली.
दरम्यान, पोलिसांनी मात्र दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. गोळीबार करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.
First Published: Friday, January 6, 2012, 11:14