Last Updated: Wednesday, January 11, 2012, 15:12
www.24taas.com , इस्लामाबाद अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात पाकिस्तानमधील उत्तर वझिरीस्तानमध्ये चार संशयित दहशतवादी ठार झाले. अमेरिकेने महिन्याभरानंतर पुन्हा दहशतवाद्यांना टार्गेट केले आहे. त्यासाठी हा केला गेल्याचे सांगण्यात आले.
नोव्हेंबर महिन्यात नाटोच्या सैन्याने पाक-अफगणिस्तान सीमेवरील पाकिस्तानच्या चौकीवर हल्ला करीत २४ पाकिस्तानी जवानांना ठार मारले होते. त्यामुळे या भागात पाकिस्तानने अमेरिकेच्या विमानांना बंदी घातली होती. या हल्ल्यानंतर आज बुधवार पहाटे पुन्हा अमेरिकेने ड्रोन विमानांतून हल्ले केले. या हल्यात संशयित दहशतवादी जखमी झालेत आहेत. हे हल्ले अधिक तीव्र होँण्याची शक्याता आहे.
उत्तर वझिरीस्तानमधील मिरनशाह भागात अमेरिकेच्या सैन्याने दहशतवाद्यांच्या तळाला लक्ष केलं. ड्रोन विमानातून सोडलेल्या दोन क्षेपणास्त्रांमुळे चार दहशतवादी ठार झाले. दहशतवाद्यांच्या तळ नष्ट करण्यासाठी अमेरिकेने पावले उचललेली आहेत. त्यासाठी महिनाभरानंतर हल्ला करून ही कारवाई संपली नसल्याचे दाखवून दिले आहे.
First Published: Wednesday, January 11, 2012, 15:12