मिशेल यांचं 'मी हाय कोळी' पूर्वनियोजित ! - Marathi News 24taas.com

मिशेल यांचं 'मी हाय कोळी' पूर्वनियोजित !

www.24taas.com, मुंबई
 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि पत्नी मिशेल ओबामा २०१० मध्ये जेव्हा मुंबईला आले होते, तेव्हा येथील एका शाळेतल्या मुलांबरोबर चक्क मराठी कोळीगीतावर नृत्य केलं होतं. कोळीगीताच्या ठेक्यावर आपल्या पदाचंही भान विसरून अचानक ताल धरणाऱ्या मिशेल ओबामांना पाहून जगभरात आश्चर्य व्यक्त केलं गेलं होतं. मात्र हे सर्व अचानक घडलं नसून पूर्वनियोजित असल्याचा दावा एका नव्या पुस्तकात करण्यात आला आहे. या नृत्यातून त्यांना जगाला सकारात्मक संदेश द्यायचा होता.
 
‘द ओबामाज’ या पुस्तकात ‘न्यूयॉर्क टाईम्स’च्या पत्रकार जोडी कांटोर यांनी लिहीलं आहे, “मुंबईमध्ये राष्ट्राध्यक्ष जेव्हा दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधांवर चर्चा करण्यासाठी गेले होते. तेव्हा मिशेल ओबामा अनाथ मुलांची भेट घेत होत्या आणि त्यावेळी त्यांनी मुलांबरोबर काही गाण्यांवर नृत्यही केलं.”
 
कंटोर यांनी लिहीलं, “प्रथम महिला (मिशेल ओबामा) यांच्या स्टाफला हा फॉर्म्युला माहित होता. मिशेल यांनी मुलांनी भरलेल्या एका खोली ठेवा, विशेषतः अशा मुलांमध्ये जी मुलं समाजाकडून मिळणाऱअया प्रेमापासून वंचित आहेत. त्यांना एकमेकांशी संवाद साधायची संधी द्या. आणि हा संवाद एका अशा पातळीवर नेऊन संपावावा जेणेकरुन उत्साहपूर्ण वातावरण आणि सकारात्मक चित्र निर्माण होईल.
 
 
 
 

 

First Published: Wednesday, January 11, 2012, 18:05


comments powered by Disqus