Last Updated: Thursday, January 12, 2012, 14:58
www.24taas.com, न्यूयॉर्क एका अमेरिकन पत्रकाराने जावईशोध लावला आहे. तो म्हणजे योगा केल्याने ब्रेन हॅमरज होतो. शोध लावणाऱ्याचे नाव आहे, विलियम ब्रॉड.
दरम्यान, एका सर्वेक्षणातून अमेरिकेत दोन कोटी लोक योगा करीत असल्याचे उघड झाले आहे. योगावर्ग हा अमेरिकेतील मोठा व्यवसाय बनला असून ब्रॉड यांच्या विधानांमुळे हा व्यवसायच संकटात सापडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, ब्रॉड यांचे ‘हाऊ योगा कॅन रेक युअर्स बॉडी’ हे योगविद्येवरील पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. या पुस्तकात योगामुळे तुमचा जीवही जाऊ शकतो, असा अजब दावा करण्यात आला आहे.
ब्रेन हॅमरेज, हृदयविकार यांसारखे आजार होतात, असाही दावा करण्यात आला आहे. पुस्तकातील काही भाग न्यूयॉर्क टाइम्स’च्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आला आहे. पुस्तकात उदाहरणादाखल एका २८ वर्षीय तरुणीचा उल्लेख केला आहे. तिने योगा करताना मान मागे घेण्याचा प्रयत्न केला असता तिला हृदयरोगाचा त्रास जाणवू लागला, यावरून अमेरिकन पत्रकार विलियम ब्रॉड यांने हा धक्कादायक निष्कर्ष काढला.
First Published: Thursday, January 12, 2012, 14:58