आकाशगंगे बाहेर सापडले तीन ग्रह - Marathi News 24taas.com

आकाशगंगे बाहेर सापडले तीन ग्रह

www.24taas.com, वॉशिंग्टन
आकाशगंगेच्या बाहेर सर्वात लहान तीन ग्रह शोधण्यात खगोलशास्त्रज्ञांच्या एका टीमला  यश आले आहे.  या तीन ग्रहांचा शोध फिलिप म्युअरहेड यांच्या नेतृत्वाखालील एका पथकाने लावला आहे.
 
पृथ्वीपेक्षा आकाराने लहान असलेल्या तीन ग्रहांचा शोध लागला आहे आणि ते ज्युपिटरपेक्षा आकाराने थोडा मोठ्या असलेल्या ताऱ्या भोवती भ्रमण करताना आढळून आले आहेत. हे ग्रहा-ताऱ्याच्या इतके समीप आहेत की तिथल्या उष्णतेमुळे जीवसृष्टीसाठी वातावरण अनुकूल नाही.
 
खगोलशास्त्रज्ञ अवकाशात अज्ञाताचा शोध घेत आहेत आणि त्यांना तारकांच्या मालिकांची अवकाशात दाटी असल्याचं आढळून आलं आहे.  अवकाशगंगेत ग्रहांची संख्या ताऱ्यांपेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्याचं सिध्द झालं आहे. आणि आता कुठे याची मोजदाद सुरु झाली  आहे.
नेचर आणि अमेरिकन ऍस्ट्रोनॉमिकल सोसायटीच्या परिषदेतील अभ्यास अहवालानुसार अंतराळात सौरमालिकेच्या पलीकडे मोठ्या प्रमाणावर ग्रह आणि तारे आढळून आहेत. आकाशगंगेच्या एका अभ्यासानुसार बहुतेक ताऱ्यांना ग्रह आहेत.  आकाशगंगेत १०० दशलक्ष तारे असल्याने अनेक ग्रहांचेही अस्तित्व समोर आलं आहे.
 
हार्वड विद्यापीठातील लिझा काल्टनेग्गर यांच्या मते, आधी ज्या तारा, तारका आणि ग्रहांचे अस्तित्व असेल अशी शक्यताही वाटत नाही. त्याहीपेक्षा अनेक नव्या गोष्टींचा शोध लागत आहे. स्टार वॉर्समध्ये दाखवल्याप्रमाणे एका ताऱ्याभोवती फिरणारे दोन सूर्य तसंच लघु तारा मंडळे आढळून आली आहेत.
 
साधारणत: सतरा वर्षापूर्वी सौर मालिकेच्या पलीकडे ग्रहांच्या अस्तित्वाची खात्रीही वाटत नव्हती. तिथे आता हजारोंच्या संख्येने ग्रह-ताऱ्यांचे अस्तित्व आढळून आलं आहे. खगोलशास्त्रज्ञ आता तीन वेगवेगळ्या तंत्रांच्या सहाय्याने अंतराळातील नव्या विश्वाचा शोध घेत आहेत आणि त्यासाठी टेलिस्कोपच्या सहाय्याने अंतरिक्षाचा वेध घेत आहेत.
 
सौर मालिकेच्या पलीकडे सुमारे ७०० ग्रहांचे अस्तित्व असल्याचं सिध्द झालं आहे आणि अजून हजारो ग्रहांची खातरजमा व्हायची आहे. नासाचे नवा केपलर टेलिस्कोप अवकाशात एक्सोप्लॅनेटचा शाध घेत आहे. पृथ्वी सोडून इतर ग्रहांवर जीवसृष्टी आहे का याचा शोध केपलर घेत आहे. आतापर्यंत फक्त काल्पनिक वाटणाऱ्या गोष्ट शास्त्रिय कसोटीवर सिध्द होईल का याचा शोध केपलर घेत आहे.
 
नेचरमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार एक मोठा ग्रह एका ताऱ्याच्या तुलनेत सरासरी १.६ पट असतो आणि हा अंदाज चुकीचा असण्याचीही शक्यता आहे.

First Published: Thursday, January 12, 2012, 17:34


comments powered by Disqus