अमेरिका व्हाईट हाऊसवर फेकला स्मोक बॉम्ब - Marathi News 24taas.com

अमेरिका व्हाईट हाऊसवर फेकला स्मोक बॉम्ब

www.24taas.com, वॉशिंग्टन 
 
अमेरिकेत आर्थिक असमानतेबाबत विरोध  वाढत आहे. हजारो नागरिकांनी अमेरिकेच्या  व्हाईट हाऊससमोर निदर्शने केलीत. यावेळी आंदोलन करणाऱ्यांनी 'स्मोक' बॉम्ब फेकून निषेध नोंदविला. त्यामुळे येथे काहीकाळ तणाव निर्माण झाला.
 
आर्थिक असमानतेविरोधात नागरिकांचा विरोध वाढत आहे. प्रदर्शन करणाऱ्यांनी अध्यक्ष बराक ओबामा यांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसच्या भिंतीजवळ 'स्मोक' बॉम्ब फेकून निषेध नोंदविला. प्रथमच अशा प्रकारचा नागरिकांकडून व्हाईट हाऊस हल्ला झाल्याने काहीकाळ गोंधळ झाला.
 

व्हाईट हाऊसच्या गेटबाहेर सुमारे एक हजार आंदोलनकर्ते उपस्थित होते. यातील एकाने हा 'गॅस' बॉम्ब आतमध्ये फेकला. या घटनेनंतर आंदोलनकर्त्यांना हुसकवून लावण्यात आले, अशी माहिती अमेरिकेतील सिक्रेट सर्व्हिसचे प्रवक्ता जॉर्ज ओजिलविए यांनी दिली. या प्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही.
 
व्हाईट हाऊसमध्ये जेव्हा 'स्मोक' बॉम्ब फेकण्यात आला, तेव्हा ओबामा हाऊसमध्ये नव्हते. ते पत्नी मिशेल ओबामाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर गेले होते. या घटनेनंतर व्हाऊट हाऊस भाग सील करण्यात आला आणि सर्व गेट बंद करण्यात आले.

First Published: Wednesday, January 18, 2012, 11:32


comments powered by Disqus