Last Updated: Thursday, January 19, 2012, 13:39
www.24taas.com, इस्लामाबाद अभिनेता आणि भाजपचे राज्यसभा सदस्य शत्रुघ्न सिन्हा यांनी बुधवारी जेन जिया या आपल्या मानलेल्या बहिणीची हृद्य भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघेही अत्यंत भावुक झाले होते.
जिया या पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्याक्ष जनरल मोहंम्मद- झिया-उल-हक यांच्या कन्या आहेत. भारत-पाकिस्तानात सतत चालू असणाऱ्या युद्धजन्य संबंधांचा दोघांच्याही नात्यावर काहीही फरक पडला नाही आणि हे बहिण-भाऊ गेली २५ वर्षं आपलं नातं जपत आहेत. जिया यांनी सिन्हा यांना इस्लामाबाद येथील आपल्या घरी आमंत्रित केलं होतं.
पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या खासदारांच्या प्रतिनिधीमंडळात शत्रुघ्न सिन्हांसोबत यशवंत सिन्हा, सैयद शहनवाज हुसैन अणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यादेखील जिया यांच्या घरी गेल्या होत्या. शत्रुघ्न सिन्हा आपल्या भेटीबद्दल म्हणाले की जियाला मला पाहून खूप आनंद झाला. ती माझी लाडकी बहीण आहे. आणि मी तिच्यावर खूप प्रेम करतो.
जिया यांनी सर्व भारतीय प्रतिनिधींना आपल्या हाताने बनवलेली चवीष्ट बिर्याणी, तळलेले मासे, आणि वेगवेगळे शाकाहारी पदार्थ वाढले. या प्रसंगी जिया यांनी शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा आणि अभिनेत्री कन्या सोनाक्षी यांचीही आपुलकीने चौकशी केली. सोनाक्षीने दबंगमध्ये केलेल्या भूमिकेचं जिया यांनी खूप कौतुक केलं. जिया यांच्यासोबत या प्रसंगी त्यांचे बंधु एजाझ-उल-हक तसेच इतर कुटुंबियदेखील हजर होते.
First Published: Thursday, January 19, 2012, 13:39