Last Updated: Sunday, October 23, 2011, 15:23
झी २४ तास वेब टीम, मुंबई
तूर्कस्थान भूकंपाच्या तीव्र धक्क्याने हादरला आहे. तुर्कस्थानच्या पूर्व भागातील कुर्दीश जमातीचे शहर म्हणून ओळखलं जाणाऱ्या वान शहरात ७.३ रिश्तर स्केल तिव्रतेच्या भूकंपाने मोठी हानी झाली आहे. या भूकंपात सुमारे एक हजार लोकं मुत्यूमुखी पडले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. वान शहरात मोठ्या इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत आणि अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. वान शहरातील दूरसंचार यंत्रणा उध्वस्त झाली असून तूर्कस्थानचे सरकार ती पूर्ववत होई पर्यंत सॅटेलाईट फोन पाठवून संपर्क प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहेत. सरकारी अधिकाऱ्यांना अजुन्ही पूर्ण नुकसानीचा अंदाज लावता आलेला नाही.
First Published: Sunday, October 23, 2011, 15:23