Last Updated: Friday, January 27, 2012, 21:44
www.24taas.com, काबूल अफगाणिस्तानमधल्या एका महिलेनं एका वेळी सहा बाळांना जन्म दिलाय. २२ वर्षांची सार गुल हिनं तीन मुलगे आणि तीन मुलींना जन्म दिला आहे. डिलिव्हरीनंतर सहाही मुलांची तब्येत उत्तम आहे.
या बाळांचं आगमन झाल्यानंतर अतिशय आनंदात असल्याची प्रतिक्रिया त्यांच्या आईनं दिलीय. पण अफगाणिस्तानमध्ये लोकसंख्या आणि गरिबी हे प्रमुख प्रश्न आहेत. अशातच या साराचा नवरा शुक्रुल्लाह काहीच नोकरी धंदा करत नाही.
त्यामुळे या बाळांचं नीट पालन पोषण कऱण्याचं आव्हानही या पालकांसमोर आहे. तरीही सध्या सहा बाळांचं आगमन झाल्यानं त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदी आनंद आहे.
First Published: Friday, January 27, 2012, 21:44