मालदीवच्या अध्यक्षांचा राजीनामा - Marathi News 24taas.com

मालदीवच्या अध्यक्षांचा राजीनामा

www.24taas.com,  माले
 
मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद नाशीद यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे आज  दूरचित्रवाणीवरून  जाहीर केले. त्यांनी आपला राजीनामा उपाध्यक्ष डॉ. वाहीद यांच्याकडे सुपूर्द केला आहे. दरम्यान, देशात निदर्शने केल्याच्याविरोधात हा राजीनामा असल्याचे सांगण्या येत आहे.
 
 
मुख्य न्यायाधीश अब्दुल्ला मोहम्मद यांना अटक करण्याची घोषणा केल्यानंतर देशभरात निदर्शने सुरू झाली आहेत. यामुळेच नाशीद यांनी राजीनाम्याची घोषणा केल्याचे समजते. मात्र, नाशीद यांचा राजीनामा डॉ. वाहीद यांनी काही दिवसांसाठी राखून ठेवला आहे.
 
 
अब्दुल्ला मोहम्मद आणि त्यांच्या समर्थकांवर कारवाई करण्यास ५० पोलीस अधिकाऱ्यांनी सोमवारी सरकारला नकार दिला होता. काही पोलीस अधिकाऱ्यांनी येथील सरकारी चॅनेलवर आक्रमण केल्याचे समजते. त्यानंतर मुख्य न्यायाधीश अब्दुल्ला मोहम्मद यांना अटक करण्याची घोषणा केल्यानंतर देशभरात निदर्शने सुरू झाली आहेत.

First Published: Tuesday, February 7, 2012, 16:29


comments powered by Disqus