Last Updated: Friday, February 10, 2012, 13:49
www.24taas.com, वॉशिंग्टन मालदीवमध्ये सुरू झालेल्या बंडानंतर नव्याने स्थापन झालेल्या सरकारला अमेरिकेने हिरवा कंदील दाखविला आहे. हे सरकार आम्हाला मान्य आहे. मात्र, या सरकारने मालदीवमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन अमेरिकेने केलं आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्रविभागाच्या प्रवक्त्या विक्टोरिया न्यूलॅंड यांना एका कार्यक्रमाच्यावेळी एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी मालदीवमधील नव्याने स्थापन झालेल्या सरकारबाबत त्यांनी भाष्य करताना सांगितले की, हे सरकार मान्य आहे.
न्यूलॅंड यांनी सांगितले, अमेरिकेचे सहाय्यक परराष्ट्रमंत्री रॉबर्ट ब्लॅक हे दक्षिण आशियाई प्रश्नांचे प्रभारी आहेत. त्यांच्याशी मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांच्याशी गुरूवारी फोनवर बोलणी झालीत. यावेळी अमेरिका मालदीवमधील परिस्थितीवर शांततापूर्वक तोडगा काढील. शांततेला प्राधान्य असेल, असे स्पष्ट करण्या आले आहे. असे असले तरी नशीद यांची सुरक्षा वाढविण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.
अमेरिकेचे सहाय्यक परराष्ट्रमंत्री रॉबर्ट ब्लॅक यांनी शांततेचे आवाहन केले आहे. ब्लॅक हे शनिवारी मालदीवला जाणार आहेत. या दौऱ्यात नवीन राष्ट्रपती मोहम्मद वहीद, माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद आणि तेथील नागरिकांशी ब्लॅक चर्चा करणार आहेत.
आखणी संबंधित बातम्या मालदीव : माजी राष्ट्रपतींच्या अटकेचे आदेशमालदीवच्या अध्यक्षांचा राजीनामा
First Published: Friday, February 10, 2012, 13:49