मालदीवमध्ये २०० आंदोलकांना अटक - Marathi News 24taas.com

मालदीवमध्ये २०० आंदोलकांना अटक

www.24taas.com, माले
 
मालदीवमध्ये दिवसागणिक आंदोलन पेटत चालले आहे. आंदोलन करणाऱ्या २०० आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या देशात तणाव वाढला आहे.
 
लोकशाही पद्धतीने निवडून आलेले मालदीवचे पहिले अध्यक्ष महंमद नाशिद यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना अटक करण्याचा न्यायालयाने आदेश दिला होता. तेव्हापासून ठिकठिकाणी प्रचंड निदर्शने सुरू आहेत.  मालदीवमध्ये अद्यापही राजकीय अस्थिरता कायम आहे. राजकीय बंडामुळे महंमद नाशिद यांना राजीनामा द्यावा लागला होता.
 
नाशिद यांच्या राजीनाम्यानंतर नाशिद यांनी बडतर्फ केलेल्या न्यायाधीशांनीच नाशिद यांना अटक करण्याचा आदेश दिला होता. तेव्हापासून ठिकठिकाणी प्रचंड आंदोलने करण्यात येत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी २००आंदोलकांना अटक केली आहे. मड्डू या शहरात प्रचंड हिंसाचार सुरू असून आंदोलन शमविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केल्याचे वृत्त आहे.

First Published: Saturday, February 11, 2012, 23:36


comments powered by Disqus