असांज अडकला बलात्कार प्रकरणात - Marathi News 24taas.com

असांज अडकला बलात्कार प्रकरणात


झी २४ तास वेब टीम, लंडन
 
'विकिलिक्स' या एका नावानेच अनेक देशातल्या राज्यकर्त्यांचा मनात धडकी भरली होती, विकिलिक्स अनेक गौप्यस्फोट करीत होते. याचेच संपादत ज्युलियन असांज मात्र आता चांगलेच गोत्यात आल्याचे दिसते. विकिलिक्सचे संस्थापक आणि संपादक ज्युलियन असांज यांना स्वीडनकडे सोपवण्याचा निर्णय लंडन हायकोर्टानं दिला. असांज यांच्यावर स्वीडनमधल्या दोन महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरोधात स्वीडनमध्ये खटला सुरू असल्या कारणानं स्वीडननं त्यांच्या हस्तांतरणाची मागणी केली होती.
 
मात्र असांज यांनी हस्तांतरणाविरोधात लंडनच्या हायकोर्टात याचिका केली होती. मात्र ही याचिका फेटाळण्यात आल्यानं असांज यांना मोठा झटका बसला. आता असांज यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. विकीलिक्ससाठी व्हॉलन्टियर म्हणून या दोन महिला काम करत होत्या. या निर्णयाविरोधा अपील करण्यासाठी असांज यांना दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली. असांज यांनी विकिलिक्सच्या माध्यमातून अनेक गौप्यस्फोट केले. त्याच्या या गौप्यस्फोटांमुळं अमेरिकाही अनेकदा अडचणीत आली होती. त्यामुळं असांज यांना अडवण्याचा हा कट असल्याचीही चर्चा यानिमित्तानं रंगली होती. तसा असांज यांनीही आपल्याविरोधात कट रचल्याचा दावा केला होता.

First Published: Wednesday, November 2, 2011, 16:07


comments powered by Disqus