अमेरिकेत आगीत ३०० कैदी होरपळले - Marathi News 24taas.com

अमेरिकेत आगीत ३०० कैदी होरपळले

www.24taas.com, वॉशिंग्टन
 
 
मध्य अमेरिकेतील हो्न्डुरासमध्ये कारागृहाला लागलेल्या आगीत 300 कैद्यांचा जळून मृत्यू झाला आहे. याबाबतची  माहिती स्थानिक अग्निशामक विभागाने  दिली.
 
 
आग आटोक्यात आली असली तरी अद्याप आगीचे कारण समजू शकलेले नाही. त्यामुले याबाबत घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारागृहाला मंगळवारी  रात्री अकराच्या सुमारास आग लागली.
 
या आगीत 300 कैद्यांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग लागली त्यावेळी कारागृहामध्ये एकूण ८५१ कैदी होते.
 
 

First Published: Thursday, February 16, 2012, 11:43


comments powered by Disqus