अफगाणला हवाय पाकचा पाठिंबा - Marathi News 24taas.com

अफगाणला हवाय पाकचा पाठिंबा

www.24taas.com, इस्लामाबाद 


अफगाणिस्तानमध्ये  शांतता नांदण्यासाठी अफगाणिस्तानने पाकिस्तानकडे पाठिंबाची मागणी केली आहे.
 
अफगाणिस्तानला सक्षम बनविण्यासाठी हा पाठिंबा मागितल्याचे सांगण्यात आले आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चा, तसेच अफगाणिस्तान, इराण आणि पाकिस्तान यांच्यातील त्रिपक्षीय परिषद पाकिस्तानात झाली. त्यानंतर पाकिस्तान पंतप्रधान कार्यालयाने संयुक्त निवेदन प्रसिद्धीस दिले.
 
अफगाणिस्तानच्या सक्षमीकरणासाठी आणि शांतताप्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी पाकिस्तानचा पाठिंबा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान ही जुळी भावंडे असून, दोन्ही देशांत शांतता प्रस्थापित होण्यासाठी आणि दोघांपुढील समान संकटांचा मुकाबला करण्यासाठी परस्पर सहकार्याची आवश्‍यकता असल्याचे करझाई यांनी म्हटले आहे.

First Published: Friday, February 17, 2012, 22:58


comments powered by Disqus