बांग्लादेश भारतावर 'भारी' - Marathi News 24taas.com

बांग्लादेश भारतावर 'भारी'

www.24taas.com, बांग्लादेश
 
आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या बांग्लादेशानं एनजीओ म्हणजेच स्वयंसेवी संस्थांच्या कामगिरीत भारतालाही मागे टाकलं आहे. 'दी ग्लोबल जर्नल' ने जगात सर्वोत्तम कामगिरी असलेल्या १०० स्वयंसेवी संस्थांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात बांग्लादेशातील बिगर सरकारी संस्थांचा वरचष्मा दिसून आला.
 
त्यांनी चौथा क्रमांक पटकावला आहे. तर या यादित भारताला १५ वे स्थान मिळालं आहे. ''बेअरफूट कॉलेज', 'अरविंद आय केअर सिस्टीम', 'प्लॅनेट रीड', 'प्रथम', 'ग्रामविकास', 'रीशी व्हॅली इन्स्टिट्यूट फॉर एज्युकेशनल रिसोर्सेस अँण्ड इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एन्टरप्रायझेस' या भारतातल्या स्वसंसेवी संस्थांचा यादीत समावेश आहे.
 
स्वयंसेवी संस्थाची कामगिरी

- जगातल्या सर्वोत्तम १०० एनजीओंची यादी


- 'दी ग्लोबल जर्नल'ने निवडल्या संस्था


- गरीब बांग्लादेशची भारतावर मात


- बांग्लादेशातील एनजीओंना चौथे स्थान


- भारत पंधराव्या स्थानावर


 
भारतातल्या सर्वोत्तम एनजीओ

- ''बेअरफूट कॉलेज', 'अरविंद आय केअर सिस्टीम',


- 'प्लॅनेट रीड', 'प्रथम', 'ग्रामविकास',


- 'रीशी व्हॅली इन्स्टिट्यूट फॉर एज्युकेशनल रिसोर्सेस अँण्ड इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एन्टरप्रायझेस'



 
 
 

First Published: Tuesday, February 21, 2012, 11:15


comments powered by Disqus