पाकिस्तानात १५ तालिबानी ठार - Marathi News 24taas.com

पाकिस्तानात १५ तालिबानी ठार

www.24taas.com, इस्लामाबाद
 
पाकिस्तानी लढाऊ विमानांनी गुरूवारी पाकिस्तानातील पश्चिमोत्तर सीमेवरील ओरकजाई टोळ्यांच्या भागात बाँब टाकले. या बाँबहल्ल्यात कमीत कमी १५ तालिबानी आतंकवादी मारले गेले.
 
पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन लढाऊ विमानांनी तालिबानी आंतकवादी लपलेल्या जागांवर हल्ले चढवून अशी चार ठिकाणं उद्ध्वस्त केली आहेत. तहरीक-ए-तालिबानचे आतंकवादी या भागात दडले असल्याची गुप्त माहिती मिळताच या ठिकाणांवर हवाई हल्ले चढवण्यात आले.
 
पाकिस्तानातीलच खादिजई समर बाजार आणि बेरमाला या भागांत हे हल्ले करण्यात आले. यात नक्की किती तालिबानी मृत्यूमुखी पडले याची माहिती अजून पुढे आलेली नाही. कारण, या भागातून माहिती प्रसारणाला मनाई करण्यात आली आहे.  तरीही यात कमीत कमी १५ आतंकवादी मृत्यूमुखी पडल्याची माहिती देण्यात येत आहे.
 
 

First Published: Thursday, February 23, 2012, 19:37


comments powered by Disqus