नेल्सन मंडेला रूग्णालयात दाखल - Marathi News 24taas.com

नेल्सन मंडेला रूग्णालयात दाखल

www.24taas.com, जोहान्सबर्ग 
 
दक्षिण आफ्रिकेचे पूर्व राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांना रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. अशा आशयाची घोषणा राष्ट्रपती भवनामधून करण्यात आली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार तज्ञांनी त्यांना विशेष उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे.
 
गेल्या काही अनेक दिवसांपासून ते पोटाच्या विकाराने त्रस्त झाले आहेत. त्यांचा हा विकार जास्तच बळावल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसचं राष्ट्रपती भवनातून सांगण्यात आलं आहे की, आम्हांला आशा आहे की, नेल्सन मंडेला हे लवकरच बरे होतील.
 
आणि संपूर्ण दक्षिण आफ्रिकेतील नागरिक आणि त्यांचे जगभरातील चाहते यांच्या शुभेच्छा आणि प्रार्थना त्यांच्या पाठीशी आहते. त्यामुळे लवकरच ते या आजारातून बरे होतील, तसचं या दिलेल्या माहितीमध्ये याव्यतिरिक्त कोणतीच जास्त माहिती दिलेली नाही.
 
 

First Published: Sunday, February 26, 2012, 07:38


comments powered by Disqus