ओसामाचं घर केलं जमीनदोस्त - Marathi News 24taas.com

ओसामाचं घर केलं जमीनदोस्त

www.24taas.com, एबटाबाद
 
अमेरिकेच्या विशेष लष्करी तुकडीने एबटाबाद येथे ज्या परिसरात ओसामा बिन लादेन याला गेल्यावर्षी ठार केलं होतं आता त्या ठिकाणी असलेलं त्याचं घर हे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी कडक सुरक्षा व्यवस्थेत उद्धवस्त केलं.
 
स्थानिक नागरिकांनी मीडियाला सांगितलं की, भल्यामोठ्या मशीन आणि खूप साऱ्या क्रेन मशीन पाकिस्तानी सैन्याच्या अॅकॅडमीपासून ८०० मीटर दूर येऊन ठेपले आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांनी लादेनच्या घराकडे येणारे सारे मार्ग बंद करून टाकले होते. सकाळी जवळजवळ ९ वा. या परिसराला उद्धवस्त करण्यास सुरवात करण्यापूर्वी या परिसरात शक्तशाली स्पॉट लाईट लावण्यात आले. तसेच अनेक सैनिकांसह मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
 
पाकिस्तानी सरकारी रेडियोने टि्वटवर सांगितलं आहे की, एबटाबाद शहरातील बिलाल कस्बे मधील ओसामाच्या परिसराला उद्धवस्त करण्यात आलं आहे. तेथील काही चॅनलनी सांगितलं की, सगळ्यात आधी तिसरा मजला उद्धवस्त करण्यात आलं, जिथे अमेरिकेच्या नेव्ही सीलने जगातील कुप्रसिद्ध दहशतवाद्याला कंठस्नान घातलं होतं.
 
 
 
 
 

First Published: Sunday, February 26, 2012, 08:28


comments powered by Disqus