Last Updated: Monday, November 7, 2011, 02:37
झी २४ तास वेब टीम, लंडन मिस वेनेझुयलानं मिस वर्ल्ड चा किताब पटकावलाय. लंडनमध्ये मिस वर्ल्डचा शानदार कार्यक्रम पार पडला. शेवटच्या सात स्पर्धकांमध्ये चांगलीच रंगत निर्माण झाली होती.
हा किताब कोण पटकवणार यावर शेवटपर्यंत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, अखेरच्या क्षणी मिस वेनेझुयला इवियन लुनॉसोल सारकोस कोलिमेनारेस हिनं बाजी मारली आणि एकच जल्लोष झाला.
मिस वर्लडचा ६१ वा किताब पटकावत तिनं या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत बाजी मारली. यंदा या स्पर्धेमध्ये भारतातर्फे कनिष्ठा धनखर हिनंही प्रतिनिधित्व केलं. मात्र, तिला या स्पर्धेत फारशी चमक दाखवता आली नाही. तब्बल १५० देशांतल्या स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
First Published: Monday, November 7, 2011, 02:37