Last Updated: Monday, February 27, 2012, 08:18
www.24taas.com, बीजिंग बीजिंगमध्ये सातव्या इंटरनॅशनल स्ट्रॉबेरी सिम्पोसियमला सुरुवात झाली आहे. जगभरातल्या स्ट्रॉबेरी उत्पादक, संशोधक आणि ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर या एक्स्पोला हजेरी लावली.
दर चार वर्षांनी होणारा हा पाच दिवसांचा इव्हेंट म्हणजे स्ट्रॉबेरी कम्युनिटीसाठी एकप्रकारे ऑलिंपिकच असतो. आशियात पहिल्यांदाच बीजिंग शहराला या एक्स्पोच्या आयोजनाचा मान मिळाला आहे. यापूर्वी इटली, अमेरिका, हॉलंड, फिनलँड, ऑस्ट्रेलिया आणि स्पेनमध्ये या एक्स्पोचं आयोजन करण्यात आलं होतं.
यावर्षीच्या एक्स्पो गार्डनमध्ये ६० देशांमधील स्ट्रॉबेरी उत्पादनाचं वेगवेगळं तंत्रज्ञान, कल्टिवेशन मेथड आणि नवनव्या व्हेरायटीज डिस्प्लेसाठी ठेवण्यात आल्या होत्या.
First Published: Monday, February 27, 2012, 08:18