पाकमधील गोळीबारात १८ ठार - Marathi News 24taas.com

पाकमधील गोळीबारात १८ ठार

www.24taas.com, इस्लामाबाद 
 
 
उत्तर पाकिस्तानमधील कोहिस्तान भागात आज मंगळवारी  बस रोखून शिया समाजातील १८ लोकांना गोळ्या घालण्यात आल्या. यामुळे पाकस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.  यामध्ये सात जण गंभीर जखमी आहेत. राजधानी इस्लामाबादपासून २०० किमी अंतरावर ही घटना घडली.  अज्ञातांनी हा गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
खैबर-पखतुन्खवा प्रांतातील कोहिस्तान जिल्ह्यात ही घटना घडली. गिलगिटहून रावळपिंडीकडे जात असलेल्या या बसवर अज्ञात व्यक्तीने अचानक तुफान गोळीबार सुरु केला. हा भाग दुर्गम असून, अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. या हल्ल्यात १८ जण जागीच ठार झाले, तर सात जण गंभीर जखमी आहेत. या हल्ल्याची अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाही. तसेच या हल्ल्यामागचे कारणही समजू शकले नाही.
 
 
 दरम्यान, पाच ते १० बंदूकधारींनी बस रोखत अंदाधुंद गोळीबार केला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. बंदुकधारी लोकांनी जबरदस्तीने बसमधून प्रवाशांनी बाहेर काढले आणि त्यांच्याकडील ओळखपत्र याची तपासणी केली. त्यानंतर गोळीबार केला. जखमींना चिलास शहरात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
 
 

First Published: Tuesday, February 28, 2012, 16:22


comments powered by Disqus