१७ बांग्लादेशी नागरिकांना अटक - Marathi News 24taas.com

१७ बांग्लादेशी नागरिकांना अटक

www.24taas.com,  मुंबई
 
 
भारतात बांग्लादेशी नागरिकांची घुसघोरी सुरू आहे. प्रामुख्य़ाने हे बांग्लादेशी नागरिक नवी मुंबई आणि मुंबई परिसरात आढळून येत आहेत. मुंबईतील मीरारोड पोलिसांनी १७ बागलादेशी नागरिकांना अटक केली आहे.
 
 
बांग्लादेशी नागरिकांत १६ पुरूष असून एका महिलेचा समावेश आहे. मीरारोड पोलिसांनी विशेष टीम बनवून संपूर्ण शहरात कोम्बिंग ऑपरेशन करून या बांग्लादेशी नागरिकांना अटक केली. या सर्वाकडे भारतात राहण्याचा कुठलाही पुरावा नव्हता. या १७  जणांची तुरूंगात रवानगी करण्यात आली. त्यांच्यावर पासपोर्ट अधिनियम कलम ३ अ , ६ अ विदेशी अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली आहे.
 
 
बांग्लादेशी नागरिकांची वाढती घुसखोरी  भारत देशासाठी घातक होत आहे. तसेच या घुसखोरीचा फटका मुंबईला बसत आहे. जास्त करून हे नागरिक फुटपाथवरच आपला संसार मांडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या नागरिकांमुळे मुंबईच्या समस्येत अधिक भर पडत आहे. त्यामुळे याचा परिणाम सोयी-सुविधांवर होत आहे. सीमेपलिकडून घुसघोरी रोखण्यास भारताला अपयश आल्याने चिंता अधिक वाढत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

First Published: Thursday, March 1, 2012, 08:55


comments powered by Disqus