Last Updated: Monday, March 5, 2012, 16:55
www.24taas.com, शिकागो 
पाकिस्तानी वंशाचा आणि कॅनडाचा नागरिक असणारा तहव्वुर राणाने अमेरिकेच्या एका कोर्टात सांगितले की, '२६/११ मुंबई हल्ल्यातील आरोपी आपला मित्र डेव्हिड हेडली हा निर्दयी आतंकवादी आहे'. आणि म्हटलं आहे की, त्याला लश्कर-ए-तोयबाच्या बाबतीत देखील माहिती होती.
शिकागो कोर्टात राणाने सरकारने केलल्या आरोपांना आव्हान दिलं आहे, आणि म्हटलं आहे की, त्याचावर नवा खटला चालवण्याची आवश्यकता नाहीये. शुक्रवारी अमेरिकेतील कोर्टात राणाच्या वतीने त्याचे वकील पेट्रिक बेलजेन यांनी म्हटलं की, हेडली एक निर्दयी आतंकवादी आहे.
ज्यांनी आपल्या जवळील लोकांशी, सरकारशी आणि कोर्टाशी नेहमीच खोटं बोलत आहे. बेलजेनने म्हटलं की, ५१ वर्षाचा राणा यांला लश्कर-ए-तोयबा बाबत काहीच माहीत नाही त्यामुळे त्याचावर नवा खटला चालवण्याची गरज नाही.
First Published: Monday, March 5, 2012, 16:55