Last Updated: Thursday, November 10, 2011, 04:36
झी २४ तास वेब टीम, इस्तांबूल पूर्व तुर्कस्तानला रात्री बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यात पाच जण ठार आणि शेकडो जण जखमी झाले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.७ इतकी मोजण्यात आली आहे.
मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. भूकंपामुळे सुमारे २५ इमारती कोसळल्या आहेत. तसेच दोन मोठे हॉटेलही कोसळले असून, त्या ढिगाऱ्यात अनेकजण अडकल्याची शक्यता आहे.
या भूकंपाचा केंद्रबिंदू व्हॅन या गावापासून दक्षिणेकडे १६ किमी अंतरावर होता. या आधी २३ ऑक्टोबरला झालेल्या ७.२ तीव्रतेच्या भूकंपात सुमारे ५०० नागरिक ठार झाले होते.
First Published: Thursday, November 10, 2011, 04:36