जपानची त्सूनामीत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रध्दांजली - Marathi News 24taas.com

जपानची त्सूनामीत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रध्दांजली

www.24taas.com, टोकयो
 
जपानमध्ये विध्वंस घटवणाऱ्या भूकंप आणि त्सूनामीला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. जपानने एक मिनिटाची शांतता पाळत विनाशकारी भूकंप आणि त्सूनामीत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रध्दांजली वाहिली.
 
या भूकंपामुळे जपानच्या फुकूशिमा अणूउर्जा प्रकल्पातून किरणोस्तर्गाची गळती सुरु झाली होती. त्यामुळे जगभरातील अणू उर्जा प्रकल्पांच्या सुरक्षिततेसंदर्भातला मुद्दा ऐरणीवर आला. फुकूशिमामुळे अनेक देशातील अणू अर्जा प्रकल्पांच्या उभारणी संदर्भात पुर्नविचार सुरु झाला. त्याचे पडसाद महाराष्ट्रातल्या जैतापूर इथेही आपल्याला उमटलेले दिसले आहेत.
 
 
ल्या वर्षी जपानला बसलेल्या ९ रिश्तर स्केल इतक्या तीव्रेतच्या भूकंपामुळे आणि त्यानंतर आलेल्या प्रलंयकारी त्सूनामीने तब्बल १६,००० लोकांना आपला जीव गमावावा लागला. जपान अजुन्ही या तडाख्यातून सावरलेला नाही. जपानी लोकांनी धीरोदात्तपणाचं दर्शन घडवत या नैसर्गिक आपत्तीचा समर्थपणे मुकाबला केला. आजची जवळपास तीन लाखांहून अधिक बेघर झालेली लोकं पुर्नवसनाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यात फुकूशिमा अणुउर्जा प्रकल्पामुळे सुरक्षिततेच्या कारणामुळे स्थलांतारित करव्या लागलेल्या ८०,००० लोकांचा समावेश आहे.
 
 
सरकार आणि विरोधी पक्ष एकत्र येत तब्बल २३० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा पुर्नबांधणीचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. जपानमधले अणूउर्जा प्रकल्पातले रिऍक्टर्स बंद करण्यात आले आहेत आणि ते परत सुरु होतील अशी चिन्हंही नाहीत.
 
 

First Published: Sunday, March 11, 2012, 11:08


comments powered by Disqus