'आंधळेपणाने विश्वास टाकता येणार नाही'- पीएम - Marathi News 24taas.com

'आंधळेपणाने विश्वास टाकता येणार नाही'- पीएम

झी २४ तास वेब टीम, मालदीव
 
भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कधी नव्हे ते पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांना चांगलेच खडसावले आहे. त्यांनी अत्यंत कठोर शब्दांत गिलानी यांचा समाचार घेतला आहे. 'आंधळेपणाने विश्वास टाकता येणार नाही' अशा भाषेत 'गिलानी' यांना भारत आता कोणाताही 'गलथानपणा' करणार नाही हेच स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.
 
पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्यावर आंधळेपणानं विश्वास ठेवणार नाही असं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केल. पाकिस्तान सरकार बरोबर चांगले संबंध ठेवण्याची आमची इच्छा असल्याचं पंतप्रधान म्हणाले. मालदीवहून विशेष विमानानं परतताना मनमोहन सिंह बोलत होते. गिलानी यांचा उल्लेख शांतीदूत कशामुळं केला असं विचारता दहशतवाद हा सामान्य व्यक्तीचा शत्रु याच्याशी गिलानी सहमत आहेत.
 
त्यांच्याशी एकत्रिपणे आम्ही काम करू इच्छीतो मात्र त्यांच्यांवर आंधळेपणानं विश्वास टाकता येणार नाही असं मनमोहन सिंग यांनी सांगितलं. मालदिवमध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांबरोबर झालेली चर्चा पाहता चर्चेची दुसरी फेरी लवकर होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

First Published: Sunday, November 13, 2011, 05:16


comments powered by Disqus