Last Updated: Monday, March 19, 2012, 13:09
www.24taas.com, वॉशिंग्टन जगावर राज्य अधिराज्य गाजविण्याचा ध्यास बाळगणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना ठार करण्याचा इरादा अल कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा होता. मात्र, ओबामा यांनी हाती सूत्रे घेतल्यानंतर लादेनचा खातमा करण्यात यश मिळविले.
आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत अल कायदा या दहशतवादी संघटनेचा नेता लादेन याने ओबामा यांनी जीवे मारण्याची आणि अमेरिकेवर हल्ला करण्याची योजना आखल्याचे सांगितले जात आहे. तशी माध्यमांनी न्यूज देल्याचे सांगितले आहे. सीएनएनचे राष्ट्रीय सुरक्षा विश्लेषक पीटर बर्गन यांनी लिहिलेल्या पत्रात याचा उल्लेख करण्यात आला आहे. या पत्रात म्हटले आहे, की एबोटाबाद येथील लादेनच्या घरातून सापडलेल्या संगणकामध्ये ही माहिती समोर आली आहे.
अमेरिकेवर हल्ला करण्यासाठी लादेनने आपल्या सहकाऱ्यांना लिहिलेल्या मेमोमधून याची चर्चा करत असे. तसेच लादेनने ओबामा आणि डेव्हिड पेट्राऊस यांनाही ठार मारण्याची योजना आखली होती. मात्र, या कामासाठी लादेन पूर्णपणे तयार झाला नव्हता. लादेनने आपल्या सहकाऱ्यांना ऑक्टोबर २०१० मध्ये ४८ पानांचा मेमो लिहिला होता.त्यातूनही बाब उघड झाली आहे.
First Published: Monday, March 19, 2012, 13:09