Last Updated: Tuesday, March 20, 2012, 13:11
www.24taas.com, अकपुलको मेक्सिकोच्या दक्षिणी राज्यात गुआरेरोमध्ये १० लोकांच्या हत्येसंदर्भात तपास करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर काही शस्त्रधारी लोकांनी हल्ला चढवून १२ पोलीस अधिकाऱ्यांची हत्या केली.
गुआरेरो राज्याचे पोलीस प्रवक्ता अतरुरो मार्टिज म्हणाले, की टेलेलोआपान शहरातील हल्ल्यामध्ये १२ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. इतर ११ अधिकारी जखमी झाले आहेत. गेल्या रविवारी या प्रांतात ७ पुरूष आणि ३ महिलांची हत्या करण्यात आली होती. याच हत्येच्या तपासणीसाठी पोलिसांचं एक पथक ठिकाणी आलं होतं. यातील १२ पोलीस अधिकाऱ्यांची हत्या करण्यात आली.
टेलेलोआपान शहर गुआरेरो आणि मिकोआकान या दोन प्रांतांच्या जवळ आहे. या भागात आमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांचं वर्चस्व आहे. या टोळ्यांमध्ये वरचे वर हाणामारी आणि खून होत असतात. या अधिकाऱ्यांची हत्या ही देखील आमली पदार्थांच्या तस्करीसंबंधाच्या कारणांवरून घडली असावी.
First Published: Tuesday, March 20, 2012, 13:11