Last Updated: Tuesday, March 20, 2012, 14:15
www.24taas.com, इस्लामाबाद पाकिस्तानातील कराची शहरात काही बंदूकधारी व्यक्तींनी एका न्यूज चॅनेललाच टार्गेट केले. हा हल्ला का करण्यात आला याची माहिती समजू शकलेली नाही.
पाकिस्तानातील कराची शहरात जियो न्यूज चॅनेलचे कार्यालय आहे. या कार्यालयावर बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केला. कार्यालयासमोर उभ्या असलेल्या ओबी व्हॅनच्या खिडक्या तोडल्या. दरम्यान, या गोळीबारात न्यूज चॅनेलमधील कोणीही कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त नाही.
हा हल्ल्याच्यावेळी शहरातील काही ठिकाणी केबल वायर कापण्यात आल्या आहेत. मात्र, दूरचित्रवाणी प्रसारण ठप्प पडल्याने काही कर्मचाऱ्यांनी केबल दुरूस्तीचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना काम करू दिले नाही. उलट धमकावण्यात आले. केबल ऑपरेटरांना राजकीय नेत्यांकडून धमकावण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
First Published: Tuesday, March 20, 2012, 14:15