कॅमल इंक नव्हे आईस्क्रिम पण दुबईत - Marathi News 24taas.com

कॅमल इंक नव्हे आईस्क्रिम पण दुबईत

www.24taas.com, दुबई
 
सांडणीच्या (उंटाची मादी) दुधापासून बनवलेलं आईस्क्रिम लवकरच संयुक्त अरब आमिरातीच्या बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
 
पहिल्यांदाच सांडणीच्या दुधापासून बनवलेलं आईस्क्रिमची निर्मिती करण्यात आली आहे.
 
सांडणीचे दुध हा  अरबांच्या पारंपारिक आहाराचा भाग आहे. सांडणीचे दुध हे गाईच्या दुधापेक्षा थोडसं जास्त खारट असतं आणि ते आरोग्याला लाभदायक असतं.
 
 
अल आईन डेअरीचे प्रमुख अब्दुल्लाह सैफ अल दारमाकी म्हणाले, की आईस्क्रिमचे विविध फ्लेवर्स बनवण्यासाठी आम्ही खूप वेळ खर्ची घातला आहे आणि तशा चवीची आईस्क्रिम बाजारपेठेत उपलब्ध नाहीत. अल आईनने या आईस्क्रिमची निर्मिती केली आहे.
 
 
 

First Published: Thursday, March 22, 2012, 15:49


comments powered by Disqus