इंद्रा नूयींचा पगार@1.70 कोटी अमेरिकी डॉलर - Marathi News 24taas.com

इंद्रा नूयींचा पगार@1.70 कोटी अमेरिकी डॉलर

www.24taas.com, वॉशिंग्टन
 
 
भारतीय वंशाच्या महिला सर्वाधिक पगार घेणाऱ्या ठरल्या आहेत.   पेप्सिको कंपनीच्या  अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयी  यांच्या पगाराचा आकडा पाहिला तर तोंडात बोटे जातील. त्यांचा पगार आहे,  १  कोटी ७० लाख १० हजार अमेरिकी डॉलर.
 
 
 
सिक्‍युरिटी ऍण्ड एक्‍स्चेंज कमिटीसमोर इंद्रा नूयी यांनी सादर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली. नूयी यांच्या निवृत्तीच्या लाभात झालेल्या बदलांमुळे त्यांचा पगार वाढल्याचे दिसून येत आहे. ५६ वर्षीय नूयी २००६पासून पेप्सिकोच्या मुख्य अधिकारी आहेत.  त्यांना २०११ या वर्षी कंपनीकडून तब्बल १  कोटी ७०लाख १० हजार अमेरिकी  डॉलर पगार मिळाला आहे. त्यांच्या पगारात गेल्या वर्षाच्या तुलनेत ५.८ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.
 
 
फेब्रुवारी २०११ मध्ये नूयी यांचा वार्षिक बेसिक पगार १ कोटी ३० लाख अमेरिकी डॉलरवरून १ कोटी ६०लाख अमेरिकी डॉलर झाला आहे. पेप्सिकोत नेमणूक झाल्यानंतर त्यांच्या पगारात झालेली ही सर्वांत मोठी वाढ आहे.  यावर्षी कंपनीच्या धोरणात आमूलाग्र बदल करण्यात येत आहे. अमेरिकेच्या बाजारपेठेत जोरदार मुसंडी मारण्यासाठी  प्रयत्न करण्यात येणार असल्याचे कंपनीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
 
 

First Published: Saturday, March 24, 2012, 16:07


comments powered by Disqus