Last Updated: Wednesday, March 28, 2012, 07:42
www.24taas.com, काबूल अफगाणीस्तानची राजधानी काबूल येथे आत्मघातकी हल्ल्याचा कट उधळून लावण्यात यश आले आहे. आत्मघातकी पथकातील १६ जणांना काबूल येथे अटक करण्यात आली. त्यामुळे संभाव्य होणारा धोका टळला आहे.
आत्मघातकी पथकातच्या सहाय्याने १६ लोकांना अफगाणीस्तानची राजधानी काबूल येथे अटक करण्यात आली आहे. या लोकांची सामूहिक आत्मघातकी हल्ला करण्याची योजना होती. यांची योजना यशस्वी झाली असती तर प्रचंड जीवितहानी झाली असती, असे अफगाणीस्तीन संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. अफगाणीस्तानच्या अध्यक्षांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरपेक्षाही कमी अंतरावर सोमवारी आत्मघातकी पथकातल्या सहा लोकांना अटक करण्यात आली, तर इतर दहा लोकांना मंगळवारी अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये अफगाणीस्तान नॅशनल आर्मीचे काही सैनिकही असल्याचे वृत्त आहे. ११ मार्चला एका अमेरिकन सैनिकाने अंदाधुंद गोळीबार करून अनेक अफगाणीस्तान नागरिकांची हत्या केली होती. त्यानंतर अमेरिका आणि नाटो सैन्यावरचे हल्ले वाढले असल्याचे निदर्शनास आले आहे.
First Published: Wednesday, March 28, 2012, 07:42